विक्रोळी वकील बार असोसिएशनणे, लाल फित बांधून व्यक्त केला जाहीर निषेध
लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, त्यातीलच न्याय पालिका ही एक आहे. परंतु या सरकारमध्ये सामान्य जनतेपासून ते न्याय पालिकेतील कर्मचाऱ्या पर्यंत कोणीही सुरक्षित नाही आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, गेल्या काही दिवसात झालेला मा. सी, जे, आई, भूषण गवई साहेब. यांच्यावर झालेला हल्ला व त्यानंतर वकिलावर झालेला हल्ला. नेमके प्रशासन करते कायअहिल्यानगर जिल्यातील शेवगाव तालुक्यात, एका ऍडव्होकेट वर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात, विक्रोळी वकील बार असोसिएशनणे सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोट वर लाल फित बांधून, हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. सर्वांना न्याय देणारी न्याय पालिका ही सुरक्षित नाही असे सर्वत्र दिसत आहे.आपला भारत देश हा अनेकतेत एकता घेऊन, सर्व रूढी, परंपरा, संस्कृती, सर्व जाती धर्माला घेऊन चालत आहे.परंतु गेल्या काही दिवसात सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटत असणाऱ्या एडव्होकेट यांच्यावर भ्याड हल्ला झाला, त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र सह, गोवाबार कौन्सीलने लाल फीत बांधून सर्वत्र निषेध जाहीर केला आहे. विक्रोळी वकील बार चे सर्व एडव्होकेटनी यात मोठया प्रमाणात सहभागी होऊन निषेध व्यक्त केला. यामध्ये विक्रोळी बारचे अध्यक्ष. मा:- ऍड.समाधान सुलाने. कमिटी मेंबर्स:- मा. ऍड:- श्रीकांत शिंदे.यांच्या सह सर्व ऍडव्होकेट सहभागी झाले. त्यातील ऍड:- नितीन वानखेडे. ऍड:- रमेश आढाव. ऍड:- रविकांत जाधव. ऍड:-शिवाजी शिंदे. ऍड:- सागर पवार. ऍड:- तानाजी सावंत. ऍड:- चंद्रकांत माने. ऍड :-संकेत गायकवाड.ऍड:- खांडकर. ऍड:-साधना लोखंडे. ऍड:- मेघा डावरे, ऍड:- डावरे. ऍड :- प्रीती हॅलोडे.सर्व जेन्टस वकीला सह महिला ऍडव्होकेट ही मोठया प्रमाणात हजर राहून, भ्याड हल्याचा सर्वांनी जाहीर निषेध व्यक्त केला. त्यावेळी त्यांच्या भावना ही व्यक्त केल्या. त्यात त्यांनी असे म्हटले की, न्यायाधीश यांच्या सह वकिलावर होणाऱ्या हल्याचे निवेदन, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्री यांच्याकडे मांडू. वकिलांची सुरक्षा केली जावी आणि हल्ले करणाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाईची मागणी करणार आहोत. असे त्यावेळी सर्व वकील बोलले.
बातमीदार:- रविकांत जाधव.
महाराष्ट्र बुलेटिनसाठी मुंबई

