राजगुरुनगरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे उग्र आंदोलन; नाशिक धर्मांतर घटनांवरून तहसीलदारांना निवेदन
राजगुरुनगर, १७ एप्रिल : नाशिक शहरात घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर व लव जिहाद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) व बजरंग दलाच्या नाशिक विभागाने तीव्र स्वरूपाची आंदोलने जाहीर केली आहेत. या मोहिमेचा पहिला टप्पा आज शुक्रवारी राजगुरुनगर तहसील कार्यालयासमोर घेतला जात असून, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या वेळी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन सादर करण्यात आले.नाशिक शहरात अलीकडे उघडकीस आलेल्या घटनांमुळे हिंदू समाजात प्रचंड रोष पसरला आहे. विशेषतः TCS नाशिक कार्यालयात घडलेल्या कथित धर्मांतर व छळप्रकरणाने वातावरण तापले आहे. यात सात जणांना अटक झाली असून, नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींनी हिंदू कर्मचाऱ्यांना धमक्या, ब्लॅकमेल, अस्पृश्य वर्तन व धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. यामध्ये धार्मिक टोपी घालण्यास भाग पाडणे, नमाज पढण्यास सक्ती करणे व अश्लील टिप्पणी करणे यांचा समावेश आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही TCS कार्यालयाबाहेरून कलेक्टर कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता.
या घटनांच्या संदर्भात व्हीएचपी बजरंग दलाने भीमाशंकर जिल्हा पातळीवर आंदोलनाची रचना केली आहे. आजच्या राजगुरुनगर आंदोलनात विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा संयोजक अवधूत चौधरी, सहमंत्री मनोज देशमुख, गोरक्ष प्रमुख दीपक गावडे, विष्णू घुमरे, शहर संयोजक निखिल तिकडे, खेड ग्रामीण मंत्री हेमंत ढमाले, किरण जाधव, ग्रामीण संयोजक ऋतुराज वाडेकर, ओमकार शिंदे, ओमकार अरगडे सह शेकडो बजरंगी उपस्थित होते. आंदोलकांनी घोषणाबाजी करत धर्मरक्षण व कठोर कारवाईची मागणी केली.हे आंदोलन केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, केंद्रीय स्तरावरून व संपूर्ण देशभर पसरविण्यात येणार आहे. नाशिक कुम्भमेळा तयारीच्या पार्श्वभूमीवर शहरात आधीच पर्यावरणीय व धार्मिक वाद सुरू आहेत. या घटनांमुळे हिंदू संघटना व स्थानिक प्रशासन यांच्यात तणाव वाढला असून, पोलिसांनी आंदोलनावर लक्ष ठेवले आहे.
या मोहिमेचा परिणाम धर्मांतर विरोधी कायदा सक्षम करण्याच्या मागणीसह लव जिहाद प्रकरणांवर कडक अंमलबजावणीवर होईल. पुणे ग्रामीणसारख्या भागात अशा घटनांची वारंवारता वाढत असल्याने, हे आंदोलन मोठ्या सामाजिक जागृतीचे माध्यम ठरेल. सरकारी पातळीवर या आरोपांची सखोल चौकशी अपेक्षित आहे.



