खेड तालुक्यात दशक्रिया घाट परिसरात झाडांची मोठी कतल; पर्यावरणाला धोका

खेड तालुक्यात दशक्रिया घाट परिसरात झाडांची मोठी कतल; पर्यावरणाला धोका

खेड तालुक्यातील जऊळके खुर्द गावात दशक्रिया घाट परिसरात झाडांची बेकायदेशीर कतल; ग्रामस्थ यांनी चौकशी मागणी केली आहे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जऊळके खुर्द गावातील दशक्रिया घाट परिसरात गायरान जागेवर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात कतल करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावातील पर्यावरणीय संतुलन बिघडले असून, नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत फॉरेस्ट विभाग, तहसील कार्यालय आणि पर्यावरण विभागाला तातडीने माहिती देऊन चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे.जऊळके खुर्द गावातील दशक्रिया घाट परिसरातील गायरान जागेवर तसेच टाकळकरवाडी ते जऊळके खुर्द व जऊळके खुर्द ते रेटवडी शिव
वन हद्दीतील या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंदाजे 200 ते 300 झाडांची कतल करण्यात आली आहे. यातील काही झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली आहेत. या झाडांमध्ये अनेक वर्षांपासून वाढलेली झाडे असून, त्यांच्या कतलीमुळे गावातील नैसर्गिक संतुलन बिघडले आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जेसीबी, कॉकलेन, डंपर आणि ट्रक यांचा वापर करण्यात आला आहे. झाडांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणारी टोळी आणि उत्खनन करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या झाडांच्या कतलीमुळे गावातील वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, वाळवंटीकरण, मातीचे क्षरण आणि वातावरणातील तापमान वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला असून, गावातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.कांतीराम बोहराडे यांनी या घटनेबाबत शासकीय कार्यालयांना अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सांगितले, “या घटनेमुळे गावातील पर्यावरणीय संतुलन बिघडले आहे. झाडांची कतल करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील.”पर्यावरण तज्ज्ञांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सांगितले, “झाडांची कतल करणे ही फक्त गावातील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करणारी घटना नाही, तर ती संपूर्ण पर्यावरणीय संतुलनाला धोका आहे. यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तसेच वाळवंटीकरणाचा धोका वाढतो.” ग्रामस्थांनी कांतीरम बोऱ्हाडे यांनी फॉरेस्ट विभाग, तहसील कार्यालय आणि पर्यावरण विभागाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. या विभागांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या घटनेचा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव लक्षात घेऊन, शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि गावातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होईल.