श्री तुळजामाता युवा मंचा अध्यक्ष अनिकेत गोरे कडून मनीषा गोरे यांना नगराध्यक्षपदी हार्दिक शुभेच्छा

श्री तुळजामाता युवा मंचा अध्यक्ष अनिकेत गोरे कडून मनीषा गोरे यांना नगराध्यक्षपदी हार्दिक शुभेच्छा

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025-2030 या महत्त्वाच्या निवडणुकीत मनीषा सुरेश गोरे यांनी नगराध्यक्षपदासाठी जनतेतून निवडणूक लढवून नगराध्यक्षपदी निवड होण्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. श्री तुळजामाता युवा मंचाचे अध्यक्ष अनिकेत भाऊ गोरे व अनिकेत गोरे यांनी सांगितले की, अजून अधिकृत निकाल थोड्या कालावधीनंतर येणार आहे, कारण काही कोर्टाच्या कारणास्तव 3 तारखेला जाहीर होणारा निकाल 21 तारखेला पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र शर्यतीतून आधीच जनतेचा सपोर्ट पाहून व मतदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्या आधीच मनीषा सुरेश गोरे यांना नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, चाकण नगरपरिषदेच्या मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला असून विविध पक्षांचे बहुप्रतिष्पर्धी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार नितीन गोरे यांचा उमेदवारी हा बिनविरोध स्वीकारला गेला आहे, ज्यामुळे या भागात त्यांचा प्रचारझपाट्याने वाढत आहे नगरपरिषद निवडणुकीत २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदासाठीही मतदान झाला आहे. निवडणुकीत प्रमुख युर्गट तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला असून वृद्ध आणि युवक यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष पाहायला मिळाला असून मतदान केंद्रांवर शांतता आणि संयमाने प्रक्रिया पार पाडण्यात आली आहेराजकीय विश्लेषणानुसार, मनीषा सुरेश गोरे यांचे अनुभव आणि जनतेशी असलेला संपर्क त्यांना नगराध्यक्षपदी निवडण्यात मदत करणारा महत्वाचा घटक ठरला आहे.या निवडणुकीचा प्रभाव स्थानिक प्रशासनावर, विकासकामांवर व राजकीय संतुलनावर दीर्घकालीन राहील. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर सामाजिक व शहरी विकासाच्या दृष्टीने नवीन योजना व सुधारणांचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.श्री तुळजामाता युवा मंचाचे अध्यक्ष अनिकेत भाऊ गोरे म्हणाले, “निकाल जरी पुढे ढकलला गेला असला तरी, मतदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मनीषा गोरे यांचे नगराध्यक्षपदासाठी यश निश्चित आहे. त्यांच्या नेतृत्वात चाकण शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास आम्हाला आहे.”