चाकण नगरपरिषद निवडणूक २०२५ : सत्ताधाऱ्यांवर विकास अपयशाचा आरोप, अनिकेत गोरेंची नव्या उमेदवाराच्या भूमिकेत धडक

चाकण नगरपरिषद निवडणूक २०२५ : सत्ताधाऱ्यांवर विकास अपयशाचा आरोप, अनिकेत गोरेंची नव्या उमेदवाराच्या भूमिकेत धडक

चाकण नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर चाकणमधील राजकीय घराण्यांमध्ये सत्तेचा आणि विकासाचा प्रश्न उभा आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्ता आणि नगरविकास खातं एका विशिष्ट राजकीय कुटुंबाच्या जवळच्या हाती असतानाही चाकण शहराचा विकास आराखडा मंजूर का नाही झाल नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, या राजकीय घराण्यांवर फक्त भावनिक राजकारण करुन निवडणूक लढवण्याचे आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनिकेत गोरे यांनी आपल्या पत्नी अनिता अनिकेत गोरे यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी उभे केले असून प्रभाग क्रमांक १ मधून महिला उमेदवार तसेच स्वतः सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे.

अनिकेत गोरे यांनी राज्यिले की, “चाकण नगरपरिषदेमध्ये गेल्या ५ वर्षे सत्तेवर असलेले राजकीय मोठे घर विकासासाठी कोणतेही योगदान देऊ शकलेले नाही. नगरविकास खाते जवळच्या माणसाकडे असतांना आराखडा मंजूर झाला नाही आणि फक्त भावनिक राजकारण व निवडणूक चाकण पतपेढी यावरच भर लागला आहे.” त्याचबरोबर त्यांनी प्रदूषण महामंडळाचे सदस्य व बाजर समिती देखील त्याच घरात असल्याचा उल्लेख करून, “विकासासाठी योगदान न करता फक्त सत्तेसाठी राजकारण करणे योग्य नाही,” असा थेट आरोप केला आहे. तसेच, नगराध्यक्ष पदासाठी शासनातल्या मोठ्या राजकीय घरातील महिलांना ५०,००० रुपये वेतन घेऊन देखील सार्वजनिक सेवेपेक्षा नफा पाहत निवडणूक लढवले जात असल्याचा प्रश्न अनिकेत गोरे यांनी उपस्थित केला आहे.

चाकण नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे, ज्यामुळे या निवडणुकीत राजकीय टरयांमध्ये तगडा संघर्ष अपेक्षित आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चुरस तसेच इतर पक्षांच्या नव्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली असून, विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, चौकशी इत्यादी मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधण्यासही सुरुवात झालेली आहे या पार्श्वभूमीवर अनिकेत गोरे आणि त्यांची पत्नी अनिता अनिकेत गोरे यांच्या उमेदवारीने चाकणमध्ये राजकीय रंगत आणली आहे आणि ही निवडणूक फक्त पारंपरिक राजकारणाच्या पलिकडे जाऊन विकासासाठी लढा देण्याची निश्चिती दर्शवित आहे.