खेड तालुका विकासासाठी अनिकेत गोरे पत्नी अनिता गोरे जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्णय
खेड तालुक्यातील युवा कार्यकर्ते अनिकेत भाऊ गोरे यांनी तालुक्यातील विकासाच्या समस्यांवर भाष्य करत सांगितले की, खेड तालुक्यात अजूनही भरपूर कामे बाकी आहेत. त्यामुळे त्यांनी ठाम निर्णय घेतला आहे की त्यांच्या पत्नी अनिता अनिकेत गोरे यांना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी उभं करणार आहेत. अनिकेत गोरे यांचा स्वतःचा सामाजिक व शासकीय कामांमध्ये अनुभव असून ते पूर्वीपासूनच रक्तदान शिबिरे आयोजित करणे, राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या महत्वाच्या कामात लोकांचे सहाय्य केले आहे. तसेच त्यांनी रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले असून खेड तालुक्यातील गरिब आणि गरजू लोकांसाठी कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने योग्य गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
अनिकेत गोरे यांच्या या निर्णयामुळे खेड तालुक्यातील सामाजिक-राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. जिल्हा परिषदेतील ही निवडणूक आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असे स्थानिक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. खेड तालुक्याच्या विकासात अद्यापही अनेक गरजा पूर्ण होण्याची गरज असून, या नव्या नेतृत्वाखाली या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनिकेत गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, “आजपर्यंत मी समाजातील गोरगरिबांच्या हितासाठी अनेक शासकीय व सामाजिक कामे केले आहेत. रक्तदान शिबिरे ते आधार व राशन कार्ड मिळवून देणे, या सगळ्याच कामांमुळे माझा परिचय एक अनुभवी कार्यकर्त्या म्हणून झालाय. माझी पत्नी अनिता गोरे यांनी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून खेड तालुक्याला पुढे नेण्याचा ध्यास घेतला आहे. योग्य वेळी कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करू.”हे पाऊल खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते. स्थानिक विकासासाठी व सामाजिक कामासाठी नव्या उमेदवारांचा उदय होणे हा खेडच्या शेकडो ग्रामीण भागांसाठी सुखद बातमीच आहे.



